मौनातून स्निग्ध धुके
दूर तिथे चंद्र फिका
पालवते रात्र अशी
जीव कसा रुख-सुखा....
आठवशी नवथर तू
ओघालाशी डोळ्यांतून
घुटमळतो श्वास अन श्वास
हात सुटे हातातून....
गाणारे क्षण विझती
झान्झारतो ऋतू हळवा
झुरमुरत्या आठवणी
मंदावत वीज दिवा....
होता तव सैल मिठी
वाऱ्याचे भान सुटे
स्निग्ध धुके विरल्यावर
चंद्राचे कमळ मिटे...!!!