कधी कुण्या मुलीवर प्रेम झालं.., काय Exact माहित नाही
पण College वर मनापासून केलं, हा वादाचा मुद्दाच नाही
आज होता alumni meet, जमले थोडे जुने यार
गुलाब पुष्प पाहुणचार, दिले घेतले शब्द चार
गेले stage चढून ते पाय, ज्यांनी class rooms कदाचित शिवले
वाहिली मने झरझरून, रडायचेच तेवढे राहिले
गायली पुराणी jeans, पाणावले डोळे बसलेल्यांचे
आम्ही घेतले झाकून कसेबसे, stage वर च्याला अवघड गेले
गळा दाटून आला होता, शब्द चिंब भिजलेले
बसलेल्यांनी मग केली साथ, पावसात अश्रू लपविले
get together काय असतं, हे पहिल्यांदाच पाहिलेलं
कुण्या प्रेयसीपेक्षा कमी नसलेलं, हे प्रेम पहिल्यांदाच जाणलेलं
- रोहित