Author Topic: kavita  (Read 1171 times)

Offline Shashi Dambhare

 • Newbie
 • *
 • Posts: 10
kavita
« on: January 30, 2013, 03:51:42 PM »
-तू ये ना सख्या-

तू ये ना सख्या,
पहाटेच्या शितवा-यासारखा झुळझुळत.....
माझ्या निद्रीस्त जाणिवांना स्पर्श करत
माझ्या पापण्यांतली स्वप्न विस्कटत,
कळत नकळत........
कळत नकळतच,
ओढून घे सख्या, माझ्या अंगावरची निर्जीव चादर
अन तुझ्या गुलाबी शालीने वेढून घे मला
एकदा तरी सर्द पहाटे
सख्या तू तुझ्याशी जोडून घे ना मला.....!
तुला माहित नाही,
युगांपासून मी रात्रीच्या आधीच रात्र होते,
डोळयांवरती पापण्या पांघरुन
वाटल्यास या रातराणीची साक्ष घे...
हातावरच्या मेंदीची
माथ्यावरच्या बिंदीची
श्वासांच्या आणीबाणीची साक्ष घे....,
तू ये ना सख्या एकदा तरी
रात्र सरण्यापूर्वी आणि उजाडायच्या आधी....
माझ्या स्वप्न प्रदेशांत,
मी  तेव्हाच असते ना माझी.......
तू ये, मंद प्रात:काली मोग-याचा होऊन गंध,
आणि पेर माझ्या नसानसांत स्वत:लाच
मंद मंद....
तू ये ना सख्या ..शितवा-यासारखा सरसरुन...
घेईन मी माझ्या  देहावरची
रात्र आवरुन.......
एकदा तरी,
तू ये ना सख्या, पहाटेच्या शांत प्रहरी.
किती युगांपासून,
 श्वास  रोखलेत....मी अधांतरी.

शशी डंभारे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: kavita
« Reply #1 on: January 30, 2013, 04:25:25 PM »
Shashi ji khup masta.

Regards...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: kavita
« Reply #2 on: January 30, 2013, 04:38:52 PM »
Wellcome Shashi ji
 
chan kavita..... pan hi pranay kavitet sudhdha chalali asati.
krupaya kavitech nav marathit taka