लोकल इन लव्ह ~ लव्ह इन लोकल
निघाली लोकल दादरहून ठाण्याला
जसे काही फक्त तुझ्याच ठीकाण्याला !!
गर्दीत थोडी ओशाळलेली
गारव्याला शोधू पाहणारी,
आला आला वारा पंख्याला
फक्त तुलाच सुखावयाला !!
रोजच्या पेक्षा हळू चाले आज
अधून मधून शीळ घालून देई साद,
सांग ही चाल काय खुणावते
फक्त तुझ्याच सहवासाची ओढ वाटते !!
किती आले गेले तुला भान नाही
चोरट्या नजरांचे तुझ्या मनी स्पर्श नाही,
ये बाहेर आता अंतरमनातुनी हे सावळी
झाली तुझ्याचसाठी जागा गार खिडकीजवळी !!
जसे आले जवळ तुझे घर तसे सर्व मंदावले
गंधर्व यक्ष किन्नर सर्व तुझ्यासाठी थांबले,
आता तरी नजर फिरव आपली माझ्या सोनुले
फक्त तुझ्याचसाठी डोळ्यात या दवं साठले !!