Author Topic: रूपडे तुझे मोहवते मना..... <3  (Read 1406 times)

Offline Tushar Bharati

  • Newbie
  • *
  • Posts: 13
 :)
डाव्या गाली तुझ्या खळी कशी
नेमकी हसतानाच फुले
तिळ त्यातले दोन नेमके
साज भारी चढवे...।

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले.
बट त्यातली हळुच डोळ्यावर पडे..।

नाजुक ओठ तुझे
रसरशीत फुललेले.
गुलाबी रंगास उपमा जशी त्यामुळेच मिळे... ।

नेत्र तुझे पाणीदार
स्वप्नातच दंगलेले.
भुवया अशा जणु ईद्रधनुष्य कोणी चितारले .. ।

कांती तुझी गव्हाळी
जशी गव्हाला सोन्याची झळाळी...
निमूळती बोटे तुझी
पण पायाची दोन बोटे गायब.... । :p

वळणदार देह तुझा
मादक तुझी कांती
पाहताच तुला होत असेल कित्येक
मनाची शांती...।

काव्य माझे बहरले.
जेव्हा असे तु दृष्टिपुढे
उपमा शोधीती फिरते शब्द
जेव्हा उपमांची खाणंच पुढे असे...

सौदर्या ने तुझ्या मन वेडे खुळावले.
तुझ्याविना सुचेना गं
जीव कसा तळमळे... ।।

कवि :- तुषार भारती..(Tush)

....╔══════V════ ═
════════════╗
·•·.·´¯`·.•·
TUSH ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`V.´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌