माझ्या रोमारोमात भिनलाय तू
माझ्या प्रत्येक श्वासात फुललाय तू
माझ्या अंगांगात पेट्लायास तू
माझ्या प्रत्येक स्पर्शात जगतोस तू
माझ्या डोल्लायतली दृष्टी तू
माझ्या ओठांची लाली तू
माझ्या केसातला मोगरा तू
माझ्या बेन्बितली कस्तुरी तू
माझ्या शब्दातला आवाज तू
माझ्या हस्ण्यातला नाद तू
माझ्या नुर्त्यातली थिरकण तू
माझ्या नुपुरांची किणकिण तू
माझ्या मेंदूची संवेदना तू
माझ्या ह्रीधयाची धडकन तू
माझी मी उरलीच कुठे? माझ्या आत्म्यात वास करतोस तू.