काय नाय आम्हाला सवय झाली हाय...
असे बॉम्ब ब्लास्ट बघून घ्याची...
आपल्या नातेवाईकांना फोन करायाची...
ते सुखरूप असतील तर सुखाने नसतील तर रडून घ्यायची
काय नाय आम्हाला सवय झाली हाय......
काय नाय आम्हाला सवय झाली हाय..
घरत बसून न्यूज बघायची..
नेत्यांना शिव्या घालायची...
आपले घरी आले तर आरामात जेवायची नसतील तर ओट्यावर पाणी भरून ठेवायची...
काय नाय आम्हाला सवय झाली...