Author Topic: फक्त तु हवी होतीस मला..... Please Come Back...  (Read 1567 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
फक्त तु हवी होतीस मला, मी जरी न
बघता पुढे गेलो तरी, मागुन आवाज
देणारी.. फक्त तु हवी होतीस मला,
माझ्यासाठी हसणारी वेळ आलीच तर
अश्रु ही पुसणारी.. फक्त तु
हवी होतीस मला,
स्वतःच्या घासातला घास आठवणीने
काढुन ठेवणारी, वेळ
प्रसंगी आपल्या वेड्या प्रियकराची समजुत
काढणारी.. फक्त तु हवी होतीस मला,
माझं जरी वाकडं पाऊल पडलं
तरी मुस्काटात मारणारी,
यशाच्या शिखरावर माझी पाठ
थोपटणारी.. फक्त तु हवी होतीस मला,
सगळ्यांच्या घोळक्यात
मला सैरभैर शोधणारी,
माझ्या आठवणीत ती असताना व्याकुळ
होणारी.. फक्त तु हवी होतीस मला,
पावसात चिंब भिजणारी अन्
मला ही तिच्या सोबत
भिजायला लावणारी.. फक्त तु
हवी होतीस मला, फुलपाखरांमागे
धावणारी फुलांचे रंग उधळत
झाडामागे लपणारी, मुक्तपणे
हसणारी आणि मला सतत हसवणारी.. फक्त
तु हवी होतीस मला, खरचं अशी एक
तरी प्रेयसी मला हवीच ती मिळेल
का मला...?

Pankaj <3 Sne......