Author Topic: तिचा SMS....(प्रशांत शिदे)  (Read 1668 times)

तिचा SMS....(प्रशांत शिदे)
« on: April 16, 2012, 10:48:59 AM »
आज सुरुवात तुज पासून करावी वाटले
मी तुला SMS पाठवला
तू हि मला REPLY केलास
कसा आहेस म्हणून
माझ्या मनाला हळुवार स्पर्शकेलंस
मी हि तेवढीच तुझी काळजी घेत होतो

तुझ्या गुड मोर्निंग SMS शिवाय माझी सुरुवातहोत नव्हती
आणि रात्र तुझ्या SMS नेच होत होती
आपली मैत्री आज एवढी जवळ आली होती कि एकमेकांशिवाय करमत नव्हते
दिवस रोज तसेच जात होते
असे असताना एक दिवस तुझा SMS आला ह्या पुढे मी तुला भेटणार नाही
मी विचार करत होतो तुला काय झाले असणार
तुला मी फोन केला पण तूझे बोलणे आता पहिल्यासारखे राहिले नव्हते
तू मला नकारते ह्याची जाणीव तुझ्या प्रत्येकशब्दांत मी जाणवत होतो ,
पण काय करणार मी खरोखरच तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो ..
आणि तुझे असे वागणे मला सहन होत नव्हते ,
मग विचार आला आपण सगळे सोडून द्यावे एकटेच रहावे आणि ते घडले हि
आता मी एकटाच असतो
एकटाच स्वतःशी बोलत असतो
आपण सोबत घालवलेल्या आठवणींचा डब्बा खोलत असतो
त्यातून तुझे शब्द - शब्द मी चाळत असतो
आठवून तुला आजही अश्रू मी गाळत असतो
पण तूला माझी जराही कदर नव्हती

सोडून घेऊन गेलीस प्रेम माझे अन देऊन गेलीस आठवण तुझी .........
जे मी पाहून जगतो आहे ....

-
© प्रशांत शिदे
« Last Edit: April 16, 2012, 10:50:03 AM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता