Author Topic: तुझी मी राधा  (Read 1757 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
तुझी मी राधा
« on: November 22, 2012, 03:50:30 PM »
   तुझी मी राधा

   मनात मी झुरावे कढ आठवणींचा येता
     तो खेळ कल्पनेचा नवा मला नाही
          तू नव्हता कधी कुणाचा हे मजला ठाऊक आहे
          परी मन ते मनात नाही हाच दोष आहे
     भेटलो कितींदा गप्पात समय सरला
    मन उघड करण्याचा प्रयत्न मज न जमला
          उघडशील कवाडे म्हणुनी हातून बसले
          अबोल या मनाचा तुला न अर्थ कळला
   निर्व्याज हास्य तुझे पाहून मीच भुलले
   तंत्र अलीप्ततेचे तुला कसे रे जमले
         मज ठाऊक मुली नवते तू कर्मयोगी मोठा
         लीला तुझ्या गुणाच्या मी पामर काय जाणू
   अलगद निसटुनी गेलास न वळूनी पहिले मागे
  मिरेसम जगण्याची मलाच होती घाई
          चांदण्यासम नितळ सुंदर तुझी छाया होती
          भ्रमात अंध होते मी त्यालाच समजले प्रीती
   वाटते अजुनी आशा मज तू जवळ घ्यावे
    प्रेमाच्य धाग्यांनी मी राधा बनुनी जगावे
              कोचरेकर मंगेश

Marathi Kavita : मराठी कविता