Author Topic: प्रेमात पडला कि असंच होणार...  (Read 5453 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापून उरणार,
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार,
तुमचं काय, माझं काय,
प्रेमात पडला कि असंच होणार...

डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,
तिच्या हास्यातून आपल्यासाठी चांदणे सांडणार,
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग,
तिच्या पुढे फिका वाटणार,
तुमचं काय, माझं काय,
प्रेमात पडला कि असंच होणार...

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,
मित्रांसमोर मात्र बेफिकिरी दाखवणार,
न राहवून शेवटी आपणच फोन करणार,
तुमचं काय, माझं काय,
प्रेमात पडला कि असंच होणार...

मन आपला तिच्याने भरून जाणार,
तिच साधपण आपण जपून ठेवणार,
प्रत्येक पहिली गोष्ट तिलाच देणार,
तुमचं काय, माझं काय,
प्रेमात पडला कि असंच होणार...

                                            .........unknown
[ हि कविता कुठेतरी वाचल्यासारखी वाटते आहे मला,
 कोणाची असल्यास त्याचं नाव जाणून घ्यायची इच्छा आहे...]
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline उमेश

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
Re: प्रेमात पडला कि असंच होणार...
« Reply #1 on: November 27, 2012, 06:09:27 PM »
konachihi aso pan kavita chaan aahe

Jayeshborse

 • Guest
Re: प्रेमात पडला कि असंच होणार...
« Reply #2 on: December 02, 2012, 11:27:48 PM »
Amcha kay ni tumcha kay premat padle ki asach honar swatache naw wisrun 'unknown' bhrkatnar

Meena

 • Guest
Re: प्रेमात पडला कि असंच होणार...
« Reply #3 on: December 16, 2012, 05:47:17 PM »
Konachya premat pado wa na pado me kavitechya premat nakkich padli

vicky rohane

 • Guest
Re: प्रेमात पडला कि असंच होणार...
« Reply #4 on: December 17, 2012, 09:54:05 PM »
khup chan, apan je koni asal pn evd nkki ki premabaddl chi ji janiv ahe te reallllllly ggggggggggggggudddddd.....