Author Topic: प्रेम  (Read 3962 times)

Offline Ajit Paralkar

  • Newbie
  • *
  • Posts: 2
प्रेम
« on: November 27, 2012, 02:14:29 AM »
प्रेम
प्रेम प्रेम प्रेम म्हणजे काय असतं
कोणी कोणावर ते करायचं असतं
एकान ते दुसऱ्यावर केलं तर चालत
की ते दोघांचं एकमेकांवर असतं

मला तरी अजून ते नीट  नाही कळत
ते खरच असतं अस नाही वाटत
की मलाच ते काय कळत नसत
म्हणून मला तसं वाटत  असत

बर ते करायचं तरी  कसं असत
ते आहे हे ओळखायच कसं असत
कुणी कुणावर ते करायच असत
की कोणाचेही ते कोणावरबसत

मुलांनी ते मुलींवर करायचं असत
की मुलीनीसुद्धा ते मुलांवर करायचं असत
जाऊ दे ते आता माझ्या वाट्याला नाही वाटत
असत माझ्या नशिबांत तर मला मिळालं असत

कवी ....अजित परळकर

 
« Last Edit: November 27, 2012, 08:43:16 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


SunitaPradhan

  • Guest
Re: प्रेम
« Reply #1 on: November 27, 2012, 08:44:40 AM »
Wow...Ajit..nice poem..aaj divsachi suruvat ya kavitene zali.

Kiran Patil

  • Guest
Re: प्रेम
« Reply #2 on: January 22, 2013, 02:11:27 PM »
Chan.!!!