Author Topic: साक्षात्कार....  (Read 2368 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
साक्षात्कार....
« on: November 30, 2012, 11:57:52 PM »
साक्षात्कार....

ती जीवनात आली तो दिवस अजुनही आठवतो....
आठवता आठवता डोळ्यांत आसवांचे पूर ठेऊन जातो....

त्या दिवशी खुप पाऊस पडत होता
जणूकाही बेधुंद बरसणारा पाऊस आमच्या
मनाला साद घालत होता....

ती खुप दूर होती फक्त
तीचे शब्दच कानी येत होते....

तरीही ते शब्द हृदयाच्या
कुठल्यातरी कोपऱ्याचा ठाव घेत होते....

ती म्हणाली काय काम आहे???
मी म्हणालो काही नाही अशीच
एक शंका विचारायची आहे!!!

ती म्हणाली विचारा ना!!!
मी म्हणालो तुझ्याकडे वेळ आहे काय???

ती म्हणाली तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे!!!
मी मनात म्हणालो आता काय विचारू???

विचारायचे तर खुप काही होते
पण तीचे मधुर स्वर कानी पडताच
सारेकाही विसरायला झाले होते....

पण अखेर धीर धरून मी तीला विचारले होते
आणि त्याचे उत्तर मला तिच्याकडून सहजपणे आले होते....

कुणाच्या मनात खुप प्रश्न असतील
की ते प्रश्न काय होते????

तर माझे असे सांगणे आहे की
त्या प्रश्नांत काहीच तथ्य नव्हते....

ते प्रश्न हा फक्त एक सेतू होता
आम्हा दोघांना जवळ आणणे
हाच त्यामागचा दैवी हेतू होता....

पाहता पाहता जवळीक वाढत गेली
दोघांनाही कळले नाही आमची मने
कधी एकमेकांत गुंतत गेली....

तीने मग एकदा मला
एक काव्य ऐकविले....

अन काय चमत्कार की
एका निर्जीव दगडाला तीने कवी बनवीले....

असे खुप चमत्कार होतात
प्रेमात काही बिघडतात तर काही सुधारतात
पण ते बदल स्वभावाशी निगडीत असतात....

पण जेव्हा जेव्हा काही मोठे बदल होतात
ज्याची अपेक्षाच केलेली नसते असे प्रकार घडतात
तेव्हाच लोक त्याला साक्षात्कार म्हणतात....
तेव्हाच लोक त्याला साक्षात्कार म्हणतात....

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.
« Last Edit: December 05, 2012, 12:00:45 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता

साक्षात्कार....
« on: November 30, 2012, 11:57:52 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Sonali11

 • Guest
Re: साक्षात्कार....
« Reply #1 on: December 28, 2012, 12:52:23 AM »
Khupach sundar lihile ahes. Masta ahe.. Kharya prematach asale sakshatkar ghadat asatat anyatha nahi.

Regards...
Sonali

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: साक्षात्कार....
« Reply #2 on: December 30, 2012, 10:03:07 PM »
Sonali ji...
... Khup abhar agadi manapasun.

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: साक्षात्कार....
« Reply #3 on: January 22, 2013, 01:21:56 PM »
असे खुप चमत्कार होतात
प्रेमात काही बिघडतात तर काही सुधारतात

keep it up. nyc 1......... :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: साक्षात्कार....
« Reply #4 on: January 22, 2013, 07:37:06 PM »
Prachi ji...
... Khup abhar agadi manapasun.

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 492
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: साक्षात्कार....
« Reply #5 on: January 24, 2013, 06:06:14 PM »
khup chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: साक्षात्कार....
« Reply #6 on: January 24, 2013, 06:38:43 PM »
mast

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: साक्षात्कार....
« Reply #7 on: January 24, 2013, 08:09:56 PM »
Shrikant ji, Prashant ji...
... Khup abhar agadi manapasun.

Pravinkg14

 • Guest
Re: साक्षात्कार....
« Reply #8 on: January 25, 2013, 11:09:15 PM »
Hi I like

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: साक्षात्कार....
« Reply #9 on: January 25, 2013, 11:38:51 PM »
Thanks Pravin.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):