Author Topic: दोन शब्द फक्त तिच्याच साठी..... जिने मला कवी बनविले....  (Read 4084 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
माझ्या कविता जीच्या भोवती घोटाळतात
विषय काहीही असो पण नेहमी जीचे गुण गातात
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!१!!

स्वप्ने पाहून वास्तवात जगण्यास शिकविले
ती ती म्हणजे कोणी अप्सरा नाही कुणी मेनका नाही
जिला देण्यास उपमाच नाही
अशीच आहे ती माझ्यासाठी खुप काही
जिने मला दुखात असतानाही हसण्यास शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!२!!
 
माझे अस्तित्व.. कुठे होते काही माझे अस्तित्व
अस्तित्व म्हणजे काय असते??
अस्तित्व म्हणजे काय असते
हे दाखवून ते जपण्यास शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!३!!

आधी पाऊस पडायचा थंडीही लागायची
मैत्री व्हायची अन नातीही वाढायची
पण त्यात खास भावना नव्हत्या
नाती कशी जपायची
नात्यांसाठी कसे जगायचे हे जिने मला शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!४!!

दुसर्यांसाठी धडपडणे
सतत काही न काही चांगले करणे
हेच जिच्या सहवासातून मी अनुभविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!५!!

जिने माणुसकी काय असते
हे मला वास्तवात दाखविले
आणि माणूस म्हणून जगतान
खरोखरच माणूस बनविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!६!!
 
कोणीही करू शकले नाही
कोणालाही जमले नाही
असे सर्वांवरच प्रेम करण्यास शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!७!!

हे सर्व करून ती मात्र वेगळीच राहिली
कसलीही अपेक्षा न ठेवता नामनिराळी झाली
आपल्या सुंदर सहवासाने
जिने माझे आयुष्य सजविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!८!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.« Last Edit: December 13, 2012, 01:07:14 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
atishay sundar Prajunkushji...
khupach chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Dhanyavad Shrikant ji ....
Khup manapasun....

Arti Pandit

 • Guest
खूपच सुंदर कविता लिहिली आहे prajunkush जी. ती व्यक्ती खरोखरच खूपच छान असेल असे वाटते.
असे वाटते तिला भेटावयास हवे. आणि ती खुप भाग्यवान हि आहे की तिच्यावर कोणीतरी अशी सुंदर कविता लिहिली आहे.
खूपच छान...

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Bhagyavan tar mi ahe Artiji ki tichyasarakhi vyakti mazya jivanat ali... Nahitar mla he shakyach navate. Mla vatate ki he shabda tichech manache ahet je mazya manatun yetahet....

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
« Last Edit: December 14, 2012, 12:52:05 PM by Madhura Kulkarni »

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...