Author Topic: पहाटेच्या अंधारांत ...  (Read 1502 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
पहाटेच्या अंधारांत ...
« on: December 11, 2012, 10:54:35 AM »
पहाटेच्या अंधारांत
जेव्हां मी उभा रहातो
आसमंतात दरवळलेला
सुमनांचा सुगंध येतो ।
वार्याच्या मंद झुळकेवर
आगळाच उत्साह असतो
गुलाबी थंडीचा त्यांत
थोडासा स्पर्श असतो ।
शांत त्या वातावरणांत
निसर्ग अबोल असतो
मनातील भावनांना मात्र
स्मृतिचे उधाण आणतो।
पूर्व क्षितिजावरील रंग
ह्यावेळी बदलत असतो
बदलत्या विचारांचा
हार मनीं गुंफला जातो ।
गुंफलेल्या हारामध्ये
सखी स्पर्शाचा गंध असतो
त्या गंध सहवासांत
मी भान हरपून बसतो ।
आभाळातील ताऱ्यांकडे
जेव्हां मी अटक पहातो
त्यां मध्ये मला माझ्या
 सखीचा चेहेरा दिसतो।
चेहेरा तिचा पाहताना
देहभान विसरून जातो
अन जीवनांतील दुःखाचा
क्षणभर विसर पडतो ।
क्षणिक त्या आभासाने
नविन असा जोम मिळतो
अन जीवनाशी टक्कर देण्या
पुन्हां एकदा सज्ज होतो।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_5.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: पहाटेच्या अंधारांत ...
« Reply #1 on: December 11, 2012, 04:52:58 PM »
surekh..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]