Author Topic: प्रेम नगरी  (Read 967 times)

Offline amit kulkarmi

 • Newbie
 • *
 • Posts: 6
प्रेम नगरी
« on: December 12, 2012, 10:25:10 AM »
प्रेमाच्या गावाला जाताना मधे येते संकोचाची नदी,
भावनांचा पूल करतो पार ती अढी,
समोर असते ती सुंदर प्रेम नगरी,
फक्त प्रेम करणारेच त्या अवनीवरी,
त्यांच्यातच असते कुठेतरी आपल्या भावनांची साथी,
घेऊन असते मनामध्ये प्रेम आपल्यासाठी,
तिचा शोध घेण्याची असते तीव्र इच्छा,
प्रेम करणारे देतात त्यांच्या सदिच्छा,
आपल्या भावनांची जणू नदीच वाहू लागते,
भावनांच्या संगमाची प्रतीक्षा करत असते,
मग तो संगम होतो हळुवार पणे,
प्रेमाचे लोट उसळतात काळजामध्ये,
तिच्या प्रेमाने मिळते मनास शांतता,
प्रेम नगरी मध्ये होते आपली सुपुर्तता,
मग ती प्रेम नगरी अजूनच फुलते,
आयुष्याचे गाणे अगदी सुरात खुलते,
तिच्या सुरांचे नी माझ्या सुरांचे नाते जमते ,
प्रेमाच्या गाण्याची प्रसूती होते ,
त्या गाण्याच्या तालावर श्रुष्टी पण नृत्य करू लागते,
प्रेम नगरी  समाधानाने तृप्त होते.
                                - अमित कुलकर्णी
« Last Edit: December 12, 2012, 04:21:51 PM by amit kulkarmi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: prem nagari
« Reply #1 on: December 12, 2012, 11:13:54 AM »
Krupaya post edit karun title marathi madhyae taka