Author Topic: ती कोणीतरी...  (Read 1932 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
ती कोणीतरी...
« on: December 20, 2012, 01:12:58 AM »
ती..
ती कोणीतरी अप्सरा दिसते
एकटी अल्लड आणि खूप छान हसते
तिच्या त्या नाजुक ओठांना अजून हर्ष व्हायला हवा
तिचा थोडासातरी स्पर्श मनाला घडायला हवा...!!१!!

तिचे काळेभोर केस आणि निळेभोर डोळे
त्या डोळ्यांच्या खोल सागरात
माझा सारा अहंकार बुडायला हवा
तिचा थोडासातरी स्पर्श मनाला घडायला हवा...!!२!!

तिचे नाजुक नाक अगदी
आतांच उमललेल्या कळीसारखे नाजुक ओठ
त्यांनी काहीतरी प्रेम राग गुणगुणायला हवा
तिचा थोडासातरी स्पर्श मनाला घडायला हवा...!!३!!

तिचा सुंदर गोल चेहरा ओठांवरच काळा तीळ
तिचा प्रत्येक क्षण अन क्षण निरखून पहायला हवा
तिचा थोडासातरी स्पर्श मनाला घडायला हवा...!!४!!

तिचे वागणे तिचा स्वभाव
अगदी हवाहवासा वाटला तिचा प्रत्येक हावभाव
तिच्या स्वभावावर तिच्या हावभावावर
एक निबंध लिहायला हवा
तिचा थोडासातरी स्पर्श मनाला घडायला हवा...!!५!!

कोण आहे ती कुठून आली इतक्यात
हळुवार भासली पण पटकन उतरली हृदयात
तिचा भासच नाही तर सहवासही घडायला हवा
माझा रोम अन रोम शहरायला हवा
तिचा थोडासातरी स्पर्श मनाला घडायला हवा...!!६!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush
« Last Edit: December 21, 2012, 12:10:22 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ती कोणीतरी...
« Reply #1 on: December 20, 2012, 11:12:37 AM »
chan kavita pan 
"तिच्या स्वभावावर तिच्या हावभावावर
एक अभंग लिहायला हवा"
 hyaat अभंग ha shabd barobar vatat naahi.

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: ती कोणीतरी...
« Reply #2 on: December 20, 2012, 08:40:48 PM »

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ती कोणीतरी...
« Reply #3 on: December 21, 2012, 03:48:02 PM »
Kedar sir, Sanjay ji...
... Khup abhar manapasun.