Author Topic: हवेच्या एका झोक्याने ...  (Read 1360 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
हवेच्या एका झोक्याने ...
« on: December 20, 2012, 10:48:57 AM »
हवेच्या एका झोक्याने ...

हवेच्या एका झोक्याने
         पुष्प गळून पडले होते
आळसावलेल्या जीवनांत
       त्याची मनांत स्मृतिरेखा उठते ।
सभोंवताली चोहिंकडे
        एकच प्रतिरूप दिसते
हृदयाच्या कोंपर्यांतून
       असह्य अशी कळ उठते ।
भुरभुरणार्या पाऊसधारा
       त्यांतही ती ऊब वाटते
आठवणीने उरल्यासुरल्या
       वीज शरिरी सळसळते ।
मातीचा तो गंध अनोखा
       त्यांतही स्मृति दाटून येते
सभोंवताली आहे सखी
        भूल मनाला ती पडते।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_15.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
Re: हवेच्या एका झोक्याने ...
« Reply #1 on: December 20, 2012, 08:45:43 PM »