Author Topic: सर आली पहिल्या प्रेमाची  (Read 2058 times)

Offline Mangesh Kocharekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 95

    सर आली पहिल्या प्रेमाची
सर आली पहिल्या प्रेमाची वाटते मनाशी गावे
हे गुपित तुला सांगावे मन माझे तुज सांगावे
     मलाच कोडे आहे का रुपात मी गुंतावे
     सर्वस्व प्रियाला दयावे अन र्हीदय जिंकुनी घ्यावे
    मन त्याचे मी वाचावे अन डोळ्यात डुंबून जावे
    तू साक्षी ह्या प्रेमाची हे गुपित तुलाच ठावे
        संकेत भेटीचा टळता मन माझे कातर व्हावे
        तो अवचित नजरे पडता मी नकळत फुलून यावे
        लटका रुसवा माझा मी प्रेमात विसरुनी जावे
        मैत्रीची शपथ रे तुजला तू मजल कवेत घ्यावे
  प्रतिबिंब पाहुनी माझे मी माझ्याशीच का हसते
  चाहूल मज  लागता मी माझ्याशीच का फसते ?
  अन त्याला चोरुनी पाहता मनाशी तारीफ करते
  हे गुपित ऎक ग सखये  प्रेमाचा पाठ  गिरवते
        तो भेटीस माझ्या  येता मन मोरपीस ते होते
        अन संकेत प्रीतीचा देता स्वप्नात हरवूनी जाते
        कसे सांगू सखये मी प्रेमाचा अनुभव घेते
        त्या एक क्षणासाठी किती मन हे कातर होते
                            कोचरेकर मंगेश     

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सर आली पहिल्या प्रेमाची
« Reply #1 on: December 21, 2012, 12:29:54 PM »
chan kavita

Offline Mangesh Kocharekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 95
Re: सर आली पहिल्या प्रेमाची
« Reply #2 on: January 08, 2013, 09:02:21 PM »
dhanywad kedarji

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):