Author Topic: जन्म दिन तुझा दुसरा ...  (Read 1132 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जन्म दिन तुझा दुसरा ...
« on: December 27, 2012, 07:53:23 AM »
जन्म दिन तुझा दुसरा ...
जन्म दिन तुझा मात्र
      अन पुण्यतिथी माझ्यासाठीं
नव्या जीवनी सुखी रहा
      ठेउनी दुःख माझ्यासाठीं।
सुखाचे मिळो आभाळ
      तुला भरार्या घेण्यासाठी
गत जन्मीच्या आठवणी
      बंद ठेवतो माझ्यासाठी ।
जगलीस तूं पूर्व जन्मी
      सुख निर्मिण्या माझ्यासाठी
आता प्रार्थितो क्षणोक्षणी
      तव जीवनांतील सुखासाठी ।
जा विसरुनि गत जीवन
      ठेवूनि स्मृतिं माझ्यासाठी
उंच उंच घे भरार्या
       नव जीवनीं सुखासाठी ।।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_21.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: जन्म दिन तुझा दुसरा ...
« Reply #1 on: December 27, 2012, 10:57:51 AM »
chan kavita