Author Topic: प्रेयसी  (Read 2017 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रेयसी
« on: December 27, 2012, 10:29:07 PM »
प्रेयसी

 तुझ्या खांद्यावर
 विश्वासान मान टाकून
 गावभर उनाडते मी

 तुझा हात धरून
 जगाशी नजर मिळवत
 कुठेही हिंडते मी

 फक्त तुझ्याशी
 प्रेमाच्या आणाभाका
 घेतल्याय म्हणून मी

 आता तूच ठरव
 माझ्या जीवनाचं भाकीत
 आयुष्य तुला वाहिलंय मी

 तू कायम राहशील
 माझा सखा न प्रियकर
 मी हि असेन तुझीच
 प्रेयसी
 असा विचार करूनच
 हा जीवनाचा
 सारीपाट खेळलाय मी

 या विश्वासाला जपायचं
 का तडा जाऊ द्यायचा
 याचा सारा हिशोब
 तुझ्या हाती सोपवलाय मी.

 संजय एम निकुंभ , वसई
 दि. २७.१२.१२ वेळ : १.०० दु.

Marathi Kavita : मराठी कविता