Author Topic: जादू सौंदर्याची ..  (Read 1296 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
जादू सौंदर्याची ..
« on: December 28, 2012, 11:28:21 PM »
जादू सौंदर्याची .................

कितीही पाहिलं तुझ्याकडे
मन भरत नाही
तुझ्या रुपाच्या जादून
नजर हटत नाही
कसा सावरू मी
तेच कळत नाही
कसं आवरू मनास
काहीच समजत नाही
तुझ्या निरागस चेहऱ्याचा
मोह टळत नाही
तुझं रूप पाहून
पापणीही लवत नाही
तुझ्या लांब सडक केसांइतका
मोगरऱ्यालाही गंध नाही
तू बंद करतेस पापण्या
मला मिठीत निज घेत नाही
तुझ्या ओठांचा गोडवा
मधालाही येणार नाही
तुझ्या सौंदर्याची सर
मेनकेलाही येणार नाही
सांग तुझ्या सौंदर्याच
वेड कसं लागणार नाही
असं सौंदर्य भू - तलावर
कुठेही आढळणार नाही
माझं काय घेऊन बसलीस
तो देवही पस्तावत असेलं
त्याच्या नजरेस हे सौंदर्य
कसे पडले नाही .

संजय एम निकुंभ , वसई
दि. २७.१२.१२ वेळ : २.३० दु.

Marathi Kavita : मराठी कविता