Author Topic: मागणें हे एक मागतो...  (Read 1178 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
मागणें हे एक मागतो...
« on: January 01, 2013, 07:44:52 AM »
नव्या नविन जन्मातील
     आज जन्मदिन तुझा
होत असेल कसा कोठे
    सांग तो सखे साजरा ।
गत जन्माची आठव ती
    होत तुजला असेल का
शपथ सात जन्माची
    अजून तुज स्मरते कां ?
आत्मा तो असे अमर
    साधू संत धर्म सांगतो
नव नविन रूप घेउनि
    सृष्टीं मध्ये वावरतो ।
म्हणुनि ह्या वर्षदिनी
    शुभेच्छ्चा मी तुज देतो
असशी तेथे सुखी रहा
    मागणें हे एक मागतो ।। रविंद्र बेंद्रे 

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_23.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: मागणें हे एक मागतो...
« Reply #1 on: January 01, 2013, 09:21:28 AM »
Sadhanaji...
... Khup chan kavita.
Tumhala ani tumchya kutumbiyana nava varshachya hardik shubheccha.