Author Topic: तुझं हे एक बरं असतं  (Read 3093 times)

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
तुझं हे एक बरं असतं
« on: January 03, 2013, 10:48:40 AM »
तुझं हे एक बरं असतं
थोडंसं रडतेस
बाकि सारं काही माझ्यावर सोडतेस
म्हणतेस अरसिक मजला
आणी छान गाणं म्हणतो तेव्हा
चक्क झोप काढतेस
प्रेमच नाही म्हणत उगा रागावतेस
पन जवळ घेता जोरात चिमटी काढतेस

तुझं हे एक बरं असतं
मला नेहमीच बुदधु समजतेस
पण सारे प्रश्न ही मलाच विचारतेस
किती बडबड करतोस असं रोज म्हणतेस
पण फोन न केल्यास केवढी झापतेस
कसले कपडे घालतोस म्हणुन नेहमी ओरडतेस
आणी मी दिलेला ड्रेस आनंदाने घालतेस

तुझं हे एक बरं असतं
एकटी असल्यावर मलाच आठवतेस
भेटायला आल्यावर निघायचं सांगतेस
माझ्याकडे चंद्र तारे सारे काही मागतेस
खुप पैसे खर्च करतो मग बोल लावुन राहतेस
माझ्या जेवणाची काळजी करतेस
आणी स्वत: उपाशी राहतेस

तुझं हे एक बरं असतं
कशीही वागतेस
पण मला मात्र खुप आवडतेस
 :) :) :)

गणेश शिवदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझं हे एक बरं असतं
« Reply #1 on: January 03, 2013, 01:49:45 PM »
va va...chan

hemant mestri

 • Guest
Re: तुझं हे एक बरं असतं
« Reply #2 on: January 04, 2013, 12:44:27 AM »
Respected poem writer,

Its vry awesome poem i ever heard.....n hats off to ur imagination power sir...
thanks for doin such a nic poem...
tumchyamulech ashya prem krnarayrana jarasa  jivhala milto...

hemant mestri

 • Guest
Re: तुझं हे एक बरं असतं
« Reply #3 on: January 04, 2013, 12:46:12 AM »
IT WAS AWESOME POEM I EVER HEARD SIR...
HATS OFF TO UR IMAGINATION POWER...
N KIP DOIN SUCH A NIC N GR8 POEM.TUMCHYAMULECH AMCHYASARKHRA PREM VEDYANA JARA DILASA MILTO

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: तुझं हे एक बरं असतं
« Reply #4 on: January 04, 2013, 11:21:15 AM »
धन्यवाद हेमंत,कुठलेहि लिखाण त्याला मिळणार्या प्रतिसादाशिवाय अपुर्ण असते....तुमच्यासाठी आणी तुमच्यासारख्या प्रेमवीरांसाठी अजुन एक कविता मी लवकरच पोस्ट करेल ....तेव्हा ती जरुर वाचा आणी आपला प्रतिसाद द्या...धन्यवाद ...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तुझं हे एक बरं असतं
« Reply #5 on: April 30, 2013, 02:57:59 PM »
छान कविता आहे :)