Author Topic: छोटीशी लव्ह्स्टोरी  (Read 3307 times)

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
छोटीशी लव्ह्स्टोरी
« on: January 03, 2013, 10:52:37 AM »
ती म्हणजे एक रुपराणी
तो होता गडी मर्दानी
रुपाची पसरली मोहिनी
त्याचे झाले पाणी पाणी

नजरेला ती नजर मिळाली
ह्रुदयाची ही तार जुळाली
प्रेमबाण ते खोलवर घुसले
ईश्काचे घन जोरात बरसले

भेट आता रोजचीच झाली
प्रेमपक्षी पावसात न्हाली
प्रेमकळीचे फुल ते फुलले
प्रेमाचे झोके उंचावर झुलले

प्रेमात झाल्या नित्य आणाभाका
एकरुप झाले सखी अन सखा
दिवस सारे कसे मजेत लोटले
पण एकदा सारे भाग्यच आटले

रुपराणीचे लग्न हो जुळले
मर्दाला हे उशिराच कळले
सारे कसे अंधारुन आले
दोघांनाही मग भरुन आले

यावर आता इलाज तो काय
पळुन जाण्य़ा सरसावती पाय
पण जाणार कुठे अन राहणार कसे
जगात होणार का प्रेमाचे हसे

शेवटी रुपराणी निघुन गेली
परत भेटण्या कधीच ना आली
मर्दाचे काही थांबेना विचार
तिचे झाले दोनाचे चार

या अशा लव्हस्टोर्या फार आहेत जगात
नाही काहो उरली काही ताकद प्रेमात
खरचे प्रेमवीर फक्त पुस्तकात उरले
या अशाच दिवान्यांनी हे जग आता भरले

गणेश शिवदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: छोटीशी लव्ह्स्टोरी
« Reply #1 on: January 03, 2013, 01:51:06 PM »
mala vatat hi virah kinwa itar kavitet asayala havi.... kavita chan aahe

Offline mkamat007

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Male
 • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
Re: छोटीशी लव्ह्स्टोरी
« Reply #2 on: January 04, 2013, 03:33:37 PM »
Laksh deu nko GaNesh kavitA khutehi aso... but its heartouching.. SupERlyk

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: छोटीशी लव्ह्स्टोरी
« Reply #3 on: January 04, 2013, 05:09:48 PM »
thank you kedarji,mandar sir.. :)