Author Topic: तुझ्याकडे येणार आहे...  (Read 2544 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
तुझ्याकडे येणार आहे...
« on: January 03, 2013, 12:55:40 PM »
क्षणांचे मणी दिवसाची माळ
           तुझ्या नावे जपतो आहे ।
अन् खोल खोल श्वास-निश्वास
          तुझ्यासाठीच सोडतो आहे ।
एक एक तुझ्या स्मृतिचा
          हार मनीं गुंफतो आहे ।
तुझ्या सहवासांत कंठलेले
         क्षण गोळा करतो आहे ।
हार गुंफतो आहे तरी
        स्मृतिंचा डोंगर मोठा आहे ।
जन्मभर गुंफला तरी
         तो तसाच राहणार आहे ।
श्वासांत श्वास असे पर्यंत
         तो तसाच गुंफणार आहे ।
अन् अखेरीस तो घेऊन
        तुझ्याकडे मी येणार आहे ।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_24.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: तुझ्याकडे येणार आहे...
« Reply #1 on: March 28, 2013, 11:02:33 PM »
Sadhnaji khup chan kavita ahe...