Author Topic: दिवान्याची कविता  (Read 1185 times)

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
दिवान्याची कविता
« on: January 04, 2013, 04:16:56 PM »
पावसाच्या पाण्यात भिजत हळुवार तु चालत आली
कोरडया माझ्या मनाला तु क्षणात भिजवुन गेली

कपाळावरची एक लट तु हळुच बाजुला केली
माझी स्वप्नपरी जशी आज धरतीवरती आली

गालावरचे दवबिंदु मग हळुच तु टिपले
तुला बघण्या माझ्यासवे क्षण सारे थांबले

माझी  स्वप्नपरी तेव्हा माझ्या मनाला भावली
सुंदर ती संध्याकाळ कशी या "दिवान्याला" पावली

भिजुन गेले अंग अंग आणी मोहीत झाले मन
उभा राहिलो तसाच पावसात,विसरुन गेलो भान

बघत राहिलो रुप तुझे अन तसाच भिजत राहिलो
पावसाच्या धारांना देखिल अलगद झेलत राहिलो

हळुच आली तशीच गेली,मनाला सोबत घेऊन
येशील पुन्हा तु ईथे एकदा,असेच वचन देऊन

पहिल्या तुझ्या भेटीला मग,मी मनात साठवत राहतो
मी फक्त तुला आणी तुलाच आठवत राहतो


गणेश शिवदे. 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दिवान्याची कविता
« Reply #1 on: January 04, 2013, 04:56:18 PM »
kyaa baat.... kyaa baat.... paavasaalyaat taakali asati tar ajun chan vaatali asati. :)

gokCOOL

 • Guest
Re: दिवान्याची कविता
« Reply #2 on: January 04, 2013, 05:04:55 PM »
 :)
NICE 1

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: दिवान्याची कविता
« Reply #3 on: January 04, 2013, 05:11:33 PM »
thanks a lot guys...kedarji,gokcool :)