Author Topic: एक रंग  (Read 1051 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
एक रंग
« on: January 07, 2013, 12:01:39 AM »
तुझे विचार मनात,
गेले भंडावून डोके.
आकार उसवला चित्रांचा,
रंग पसरले अनोखे.

तू हासणे उधळीत चालणे,
उधळीत रंगाची रंगयात्रा.
तू निघून गेल्या नंतर,
उरे आठवणींची गंधयात्रा.

वेगळे अस्तित्व होते,
प्रत्येक माझ्या रंगाला.
तू धका लावलास नि,
 
 अवघा रंग एक झाला.

..........अमोल
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एक रंग
« Reply #1 on: January 07, 2013, 11:18:04 AM »
kavita chan aahe....
 
तू धका लावलास नि,
अवघा रंग एक झाला.
 
mala vatat dhkka ha shbd hava hota ka?