Author Topic: धूंदी तशीच राहून गेली...  (Read 1019 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
धूंदी तशीच राहून गेली...
« on: January 07, 2013, 07:18:53 AM »
जीवनांतील प्रत्येक मनिषा
                  पूर्णत्वास नाहीं गेली
कारण अर्ध्यावरच जीवनांत
                 सखी मला सोडून गेली ।
नदीच्या तीरावर
समुद्राच्या काठावर
यमुनेच्या वाळूवर
             फिरण्याची इच्छा राहून गेली ।
ताजमहलच्या सानिध्यांत
हिमालयाच्या दरी खोर्यांत
काश्मीरच्या निसर्गांत
             रहाण्याची मनीषा राहून गेली ।
सुगंधी त्या जीवनाची
तारुण्याच्या उन्मादाची
अन प्रेमळ सहवासाची
             धूंदी तशीच राहून गेली  ।।

रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_5747.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: धूंदी तशीच राहून गेली...
« Reply #1 on: January 07, 2013, 09:15:16 AM »
Sadhna ji chhan kavita ahe. 
सुगंधी त्या जीवनाची
तारुण्याच्या उन्मादाची
अन प्रेमळ सहवासाची
धूंदी तशीच राहून गेली  ।।

Chan bhav...
Regards..