Author Topic: जन्मं हे उरले सुरले ...  (Read 1033 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
जन्मं हे उरले सुरले ...
« on: January 10, 2013, 08:42:07 AM »
जीवनाच्या जंजाळात
एकट्याला सोडून गेले
मृत्युबरोबरच माझ्या
सुख सारे घेऊन गेले ।

आता कसे सांगू मी
भाव माझ्या मनातले
विरून गेले एकाएकी
शब्द माझ्या ओठावरले ।

जीवनांत सुखाचे मी
तुझ्या संगे क्षण वेचले
आठवण ठेऊन त्याची
आज तुझ्या स्वप्नीं आले ।

घे एकदा जवळ मला
सुख जरी ते स्वप्नातले
त्या आधारे राहीन
जन्मं  हे उरले सुरले ।।

रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .

Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_30.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: जन्मं हे उरले सुरले ...
« Reply #1 on: January 10, 2013, 09:34:21 AM »
Sadhna ji...
.... Apratim ekadam. Kharach dolyant pani analet.

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: जन्मं हे उरले सुरले ...
« Reply #2 on: January 10, 2013, 12:03:17 PM »
khoopach chaan.