Author Topic: प्रेम  (Read 2023 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
प्रेम
« on: January 10, 2013, 09:14:02 PM »

       प्रेम 
प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
हे कळायचं ते खर तर वय नसत
काळात नसत पण मन अस्वस्थ
नकळत मन जिथे उगाचच  गुंतत
गुंतून घेण्यासाठी मागे  मागे फिरत
तेव्हाही कुठे कळत ते प्रेम असत ?
     प्रेम म्हणजे नक्की क्काय असत ?
    वाट पाहत कितीतरी वेळ घुटमळत
    नाना कुशांकानी किती  अधीर बनत
    नजरेस दिसताच क्षणात धुंदावत
    अन राग विसरून मिठीत शिरत
    दिस मासी अती  अधीर बनत
प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
रुसण फुगण तर नेहमीच चालत
संशयाने मनी कातावत अन  खंतावत
मळभ दूर होताच चिंब चिंब  भिजत
मोबाईल एस एम एस वर लट्टू होत
ओठाच्या स्पर्शानी मिटल्या नेत्रांनी सुखावत
   प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
   दिवसाला चांदणी रात्र मानत
   अन रात्री मोबाइलवर गप्पात रंगत
   एक दिवसच्या अंतराला युगे म्हणत
   भेटत नाहीजा म्हणून निरोप धाडत
   रागात आल चक्क आई बापही काढत
   इंग्गा दाखवला कि माफी मागत
  शर्टला नाक फुसत ढसा ढसा रडत
प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
मनाच  नात जेव्हा  मनाशी जुळत
भेटीसाठी क्षणो क्षणी झुरत
सोबत असता त्याची न काही सुचत 
गर्दीतही मग त्यांना न भान उरत
त्याच नाव प्रेम-प्रेम प्रेम असत
प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
एकांतात नव्हे गर्दीतही रुसत
बर बाई  म्हणताच चिमटा  काढून हसत
बर्फाच्या गोळ्यासाठी हटून  बसत
त्याच्या साठी स्टायलिश कपड्यात येत
एस एम एस घेणाच उमजून टाळत
तेव्हा कुठ काळात प्रेम खूळ असत
     मंगश नोचारेकर     
Marathi Kavita : मराठी कविता