Author Topic: शब्दा मागून शब्द जोडतो ...  (Read 1337 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
शब्दा मागून शब्द जोडतो
   काव्य रचितो तुझ्यासाठी
स्वरामध्ये स्वर मिसळूनि
   सूर जोडतो तुझ्यासाठी।
मृगजळामागे तसे धावतो
   तुझ्या प्रेमळ सहवासासाठी
रानोरानी फिरतो जैसा
   भ्रमर कमलिनी शोधासाठी।
तडफडतो जीव माझा
   गोड तव मिलनासाठी
आक्रंदतो चक्रवाक जसा
   रात्रभर आपल्या प्रियेसाठी।
लोट्लेस जरी दूर मला
   जगेन मी तुझ्यासाठी
ह्या नाहींतर पुढल्या जन्मीं
    भेटशील ह्या आशेपोटी ।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2013/01/blog-post.html
« Last Edit: January 11, 2013, 08:24:36 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: शब्दा मागून शब्द जोडतो ...
« Reply #1 on: January 11, 2013, 11:00:08 AM »
Sundar kavita ahe sadhnaji....