Author Topic: त्याच्या तिच्यातल वादळ............  (Read 1354 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
त्याच्या तिच्यातल वादळ............

तिच्या लालगुलाबी ओठांच्या होत असलेल्या हालचाली
अन त्यातून आलेले प्रेमाचे शब्द
पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटत होते
तो  मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे एकटक  पाहत होता
तिच्या बोलक्या डोळ्यांची भाषा समजण्याचा प्रयत्न तो करत होता
तिची त्याच्या डोळयाला भीडलेली नजर सरळ त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती
तिच्याकडे बघण्याचीसुध्दा ओढ आणि
आता तिच्या नजरेला टाळण्याचीसुध्दा ओढ...
सगळं कसं अजबच वाटत होतं
मनातली घालमेल वाढतच होती
तिचा तो पुसटसा होणारा स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता
तिला एकदा  मिठीत घेण्याची इच्छा त्याच्याही मनात येऊन गेली
तिचा वाढलेला श्वास अन त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड
त्याशिवाय त्या खोलीत काहीच जाणवत नव्हत
त्याने थरथरत्या हाताने तिचा हात आपल्या हातात घेतला
अन तिच्या अंगावर भीतीचा शहारा येऊन गेला
सर्व काही नजरेतच होत होत
भावना व्यक्त करायला इथे शब्दांची गरज  वाटत नव्हती
त्याने अलगत तिला जवळ खेचल
ती पण त्याच अलगतिने त्याच्या  जवळ गेली
ओठांनी ओठांना  कधी घेरल ह्याच  भानच उरल नव्हत
त्याच्या मनातल्या भावनांचं वादळ
तिच्या मनात  घोन्घाउ लागल होत
एकमेकांच्या एवढे  जवळ ते कधी आले हे त्यांना कळलच नव्हत...shobhana
Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Shona ji kavita chan ahe pan shrungarik kavitet yayla havi.

Offline mkamat007

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Male
 • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
All your compositions are really very gud.... Pls ignore all dis comments.. Instead of appreciating effort these people r demoralising u.. Keep it up..
« Last Edit: January 11, 2013, 03:57:14 PM by mkamat007 »

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
nice

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
खुप छान

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
nice1

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):