Author Topic: कां वाटले मनाला...  (Read 1491 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
कां वाटले मनाला...
« on: January 13, 2013, 08:07:56 AM »
कां वाटले मनाला ...

कां वाटले मनाला
    भेटांविस तूं मला
शांति तसा मिळावा
    विरंगुळा ह्या जीवाला ।
यत्न नाहीं केले
    परि दिन एक आला
साथ दिली दैवाने
    अन भेटलो एकमेकाला ।
हृदयांस मिळावे हृदय
    जीव जीवांस मिळावा
आण घेउनि लागलो
   आपण दोघे संसाराला ।
संसार तो सुखाचा
    काळ तो कसा गेला
धुंदीत त्या सुखाच्या
    कळला नाहीं अपुल्याला ।
अचानक एके दिवशी
    काळाने तो डाव साधला
संसारातून सखीला
    हळूंच तो घेऊन गेला ।
जीवनांत राहिलो मी
    साथ घेउनि विरहाला
अश्रूंची माळ घालतो
    मम सखीच्या स्मृतिला ।।

रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2013/01/blog-post_3.html
« Last Edit: January 13, 2013, 08:08:54 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
Re: कां वाटले मनाला...
« Reply #1 on: January 13, 2013, 09:35:21 AM »
sundar ahe kavita...virahach dukh kharach zelata yet nahi...