Author Topic: फक्त तुझी साथ हवीय....  (Read 2594 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
फक्त तुझी साथ हवीय....
« on: January 13, 2013, 09:19:44 AM »
कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय


तुझ्या प्रत्येक पावलासाठी
तुझं पाऊल बनायचयं
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी
तुझा श्वास बनायचयं

कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय

तुझ्या गालावर खिळण्यासाठी
तुझं हास्य बनायचयं
तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी
मला तुझच  बनायचयं

कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय


श्वासांपलीकडच्या गावातही
तुझी सावली बनायचयं
माझ्या आंधळ्या प्रेमाला
फक्त तुझी साथ हवीय

कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय

-आशापुञ

Marathi Kavita : मराठी कविता