Author Topic: तु अजून किती रागावणार...  (Read 7892 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तु अजून किती रागावणार...
« on: January 18, 2013, 11:47:27 PM »
सूर्याशिवाय किरणे
कधीतरी राहतात का
रात्रीशिवाय चांदण्या
कधीतरी चमकतात का
तु अशी किती दिवस राहणार
तु अजून किती रागावणार...!!१!!

मला माहित आहे
हो मला माहित आहे
तुला राग नाही आला
कारण तूच म्हणतेस की
तुला राग येत नाही
कुणी किती दुखावले तरी
तु अबोला धरत नाही
मग अजून किती
माझ्याशी अबोला धरणार
तु अजून किती रागावणार...!!२!!

तुला काय माहित
तुझे काय मोल आहे
हिऱ्याला काय माहित
तो किती अनमोल आहे
जसे त्याचे मूल्य जोहरी
तसे तुझे मूल्य
मीच तर जाणणार
तु अजून किती रागावणार...!!३!!

तुला एक सांगू
तु अशीच रागवत जा
खोटे खोटे माझ्यावर
तु अशीच रुसत जा
मग मी पण तुला
तसेच मनवणार
तु अजून किती रागावणार...!!४!!

तु रागावलीस ना
की खुप छान दिसतेस
राग गेला की मग
छोट्या बाळासारखी हसतेस
तुझे निरागस हसू मी
डोळ्यांत साठवून ठेवणार
तु अजून किती रागावणार...!!५!!

तुला ओळखणारे खुप आहेत
प्रेम करणारेही खुप आहेत
त्यात मी तर कुठेही नसणार
जरी नसलो तरी फक्त
तुझा अन तुझाच राहणार
तु अजून किती रागावणार...!!६!!

तु आता नाहीस तरी
तुला मी मनात पाहतो
तुझी प्रत्येक आठवण
रोज रोज आठवतो
तु नाही आठवले तरी
मी तुला आठवणार
तु अजून किती रागावणार...!!७!!

कधी कधी असे वाटते
तुझ्याकडे यावे
तुझ्याकडे पाहात पाहात
तुझेच होऊन राहावे
माझ्या मनीचे हे स्वप्न
कधी पूर्ण होणार
तु अजून किती रागावणार...!!८!!

आता अजून रागाऊ नकोस
माझाही अंत पाहू नकोस
आता जर तु नाही बोललीस तर???
आता जर तर नाही घेऊन बसणार
सरळ बोलायला लागणार
सरळ बोलायला लागणार...!!९!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Sayli Prabhu

 • Guest
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #1 on: January 26, 2013, 09:55:23 AM »
Tine kavita vachali asel tar rag gelahi asel ticha. Chan zaliy kavita.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #2 on: January 26, 2013, 12:13:24 PM »
प्रेमात कधी भान नसते

  म्हणून रागाला कारण नसते

प्रेम माझ्यावर खूप करते

 म्हनून सारखी सारखी रागावत असते

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #3 on: January 29, 2013, 10:34:10 PM »
Thanks ... Prajdeep.

mayur deore

 • Guest
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #4 on: January 31, 2013, 04:42:12 PM »
nice poem dost

Chimu

 • Guest
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #5 on: January 31, 2013, 07:26:00 PM »
Khup masta ahe

Offline vaibhav2183

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #6 on: February 01, 2013, 12:02:06 AM »
mast aahe

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #7 on: February 01, 2013, 01:02:27 PM »
Vaibhav ji, Mayur, Chimu...
... Khup abhar agadi manapasun.

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #8 on: February 01, 2013, 10:06:52 PM »
mulat mhanje premat ragavna n rusna havach tyashivay premat manvayla majach yet nahi..
tila manavnyatch khup gammat aste..
barobar na?
khup chan kavita
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु अजून किती रागावणार...
« Reply #9 on: February 02, 2013, 03:55:55 PM »
Shrikantji ticha rag gela ahe ata. Khup abhar agadi manapasun.
« Last Edit: February 02, 2013, 03:57:32 PM by Prajunkush »