Author Topic: धुक्यात पायवाट आज हरवून गेली आहे  (Read 1465 times)

Offline ankush.sonavane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
      धुक्यात पायवाट आज हरवून गेली आहे

थंडगार धुक्यात हरवून गेली आहे
कोठून सुरवात झाली कोठे जावून थांबली आहे
वेडावलेले मन तिला शोधत आहे
धुक्यात पायवाट आज हरवून गेली आहे

           सोनेरी किरणाच्या सोबत ती भेटायची
          वाहणाऱ्या वाऱ्यासोबत ती झुलायची
           हिरवा शालू पांघरून यायची
           ओढ मात्र मला तिचीच असायची
           आज मात्र ती नजरेआड आहे
           धुक्यात पायवाट आज हरवून गेली आहे

भरकटलेल्या पावलांना दिशा देणारी होती
चुकलेल्या वाटसरूंना घरी घेवून जाणारी होती
पावसाळ्यात भिजत अस्तित्व टिकवून होती
रणरणत्या उन्हात स्वतः जळत होती
दवबिंदूच्या शोधत मी तिला शोधत आहे
धुक्यात पायवाट आज हरवून गेली आहे

        गुलाबी थंडी अंगाला झोंबू लागली
        कोवळी सूर्याची किरणे हवी हवी वाटू लागली
        मनात स्पंदने दाटून येवू लागली
        वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली
        मी तिच्या शोधात निघालो आहे
       धुक्यात पायवाट आज हरवून गेली आहे

                                                   अंकुश सोनावणे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
chaan ahe kavita

Offline Tejas khachane

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • तू आणि फक्त तूच……
  • www.tejasandcompany.webs.com
स्वप्न तिचे मनी आजही  गुंफून आहे ,
ओढ तिची जीवनी वाढतच आहे,
ज्योत नव्हे फक्त ती प्रज्योत आहे,
असे स्वप्न अन्तरी सरावात आहे ,
पण नैराश त्या क्षणाचे स्वीकारावे लागले,
जशी धुक्यात पायवाट  गेली आहे .