Author Topic: अंतर  (Read 1317 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
अंतर
« on: January 20, 2013, 11:38:17 AM »
नाही आवडत गं अंतर मला
जेव्हा ते तुझ्यात अन् माझ्यात असतं
माझंच जग मला तेव्हा परकं भासतं
जगातली कोणतीही गोष्ट
दूर असलेली चालेल मला
पण तुझा दुरावा
नकळतही नकोय मला
तुझ्याविना मी म्हणजे
जीव, प्राण नसलेला
तुझ्याविना मी म्हणजे
सागर, किनारा नसलेला
तुझ्याविना मी म्हणजे
मीच, माझा नसलेला

(तितक्यात ती जवळ येते
नजरेला नजर भिडते
मिलनास आतुरलेली ती दिसते
नकळत अंतर मिटते
श्वासांत श्वास गुरफटतात
तापलेल्या मातीत पावसाची सर कोसळते
तो स्पर्श, ते मिलन अन् तो गंध
दरवळत राहतो, दरवळत राहतो)

नाही आवडत गं, अंतर मला
नाही आवडत गं, अंतर मला         

-आशापुञ

Marathi Kavita : मराठी कविता