Author Topic: बंधन सारे तुटले आहे…  (Read 1448 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
बंधन सारे तुटले आहे…
« on: January 21, 2013, 11:07:43 AM »
तुझ्या कष्टी जीवनाचा

     अंत तो झाला आहे

स्वातंत्र्याने उडण्यासाठी

    अनंत आभाळ उभे आहे ।

नाहीं अडवीत तुला मी

   आवरूनि हुंदका घेत आहे

नेत्री आलेले अश्रू ही ।

   कोरडे करून टाकत आहे

सात जन्माच्या साथीची

   शपथ आपण घेतली आहे

सप्तपदीच्या त्या शपथेतून

   तुला मोकळे केले आहे ।

नको पाहूं थबकून मागें

   पाऊल पुढें पडले आहे

नको ठेऊ आशा मागें

    बंधन सारे तुटले आहे ।।रविंद्र बेंद्रे
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_4199.html
« Last Edit: January 22, 2013, 09:15:59 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: बंधन सारे तुटले आहे…
« Reply #1 on: January 21, 2013, 01:42:17 PM »
sundar

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: बंधन सारे तुटले आहे…
« Reply #2 on: January 21, 2013, 05:04:57 PM »
mala watat ho virah kavita aahe.