Author Topic: त्यांचेच सारे विश्व...  (Read 1199 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
त्यांचेच सारे विश्व...
« on: January 22, 2013, 11:08:50 PM »
गाडीत होती खुप गर्दी
गर्दीतले ते दोघे
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...!!१!!

एकमेकान जवळ
एकमेकांना बिलगून
प्रेमाच्या त्यांच्या गोष्टी
सर्व जगाला विसरून
फक्त प्रेमच तेवढे खरे
बाकी सर्वच फसव
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...!!२!!

कधी हट्ट कधी राग
हा तर असतो
प्रेमाचाच भाग
आधी त्याच्या तर
आता तिच्याही डोळ्यांत अश्रू
ह्यातच असते प्रेमाचे खरे सत्व
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...!!३!!

त्याने तिला जवळ ओढले
कितीतारींनी नाक मुरडले
पण त्यांनी नाही दिले
त्या सर्वांना महत्व
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...!!४!!
 
प्रेमात हे असेच असते
जसे दिसते तसे नसते
कोणी समजते वाईट
पण प्रत्येकाचे सेम नसते
कोणी कसा लावायचा अर्थ
हा ज्याचा त्याचा प्रश्न
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...!!५!!

तो होता लहान
ती हि होती लहान
पण प्रेमात नसते
वयाचे भान
प्रेम ठेवत नसते
वयाचे जडत्व
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...!!६!!

स्टेशन आले जवळ
तसे बंध झाले सैल
दोघांच्याही मनात होती
विरहाची घालमेल
एकमेकांना निरोप देऊन
मग पकडले आपापले मार्ग
पण त्यांच्यासाठी जणू होते
त्यांचेच सारे विश्व...
त्यांचेच सारे विश्व...!!७!!


... प्राजुन्कुश
... Prajunkush

« Last Edit: January 22, 2013, 11:13:13 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: त्यांचेच सारे विश्व...
« Reply #1 on: January 23, 2013, 07:02:44 PM »
mast ahe

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: त्यांचेच सारे विश्व...
« Reply #2 on: January 23, 2013, 10:47:08 PM »
प्रशांत जी...
... खुप आभार अगदी मनापासून.

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: त्यांचेच सारे विश्व...
« Reply #3 on: January 24, 2013, 04:39:26 PM »
khupach chan.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: त्यांचेच सारे विश्व...
« Reply #4 on: January 24, 2013, 08:13:03 PM »
Shrikant ji...
... Khup abhar agadi manapasun.