माझे एक आर्जव तू मूकपणे ऐकून घे,
तव हृदयी थोडी तरी जागा तू मला दे!
प्रेमात या चिंब, धुंद झाले रे मन माझे,
फक्त त्याला आता तव स्नेहाचा एक धागा दे!
आयुष्याचे शिल्प हे कधीच तयार आहे रे माझे,
फक्त आता त्याला तुझ्या मैत्रीचा एक स्पर्श दे!
तुजसवे जगण्या अधीर होते मन हे माझे,
बस - त्यासी तुझकडील थोडासा हर्ष दे!