Author Topic: तिची अन त्याची पहिलीच भेट  (Read 2150 times)

Offline Rupesh Naik

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • शब्द ओशाळले भाव रेंगाळले....!!शब्द तुझे भाव माझे..!!
“आज तरी उशीर होऊ नये” गर्दीतून वाट काढत सेकंद काट्यावर लक्ष राखून कंपनीची बस पकडायची रोजचीच सवय, पण आज जरा खास आहे ना .. तिची अन् त्याची पहिलीच गाठ आहे ना ..
      तसा तो चालतच जातो पण आज Taxi केली. पाहिलं इम्प्रेशन चांगल राखण्याची थोडीफार शिकस्त केली इच्छितस्थळी पोहोचल्यावर त्याने नजर चौफेर फिरवली. प्रत्येक चेहरा त्याला साद घालत होता अन् ती असल्याचा भास करून देत होता. तेवढ्यात पाठीवळ हळुवार थाप पडली. पहिल्यांदाच दोन अनोळखी नजरांची भेट झाली. पण का कुणास ठाऊक तिला त्या नजरेत एक ओढ दिसली. दोघे भानावर आले तेव्हां त्याने हाथ पुढे केला.
“Hello..”
तिने संस्काराचा पाठ पढवत नमस्कार केला. चाचपत यानेही दोन हाथ जोडले. हाथ मिळणे जर एवढे कठीण तर हृदय मिळणे किती असेल याचे गणित केले.
      त्याने coffeeshopकडे हाथ दाखवला. ती देखील त्याने दाखवलेल्या मार्गापथावर चालू लागली. त्याने Corner table with two chair निवडल. मोकळेपणाने बोलू शकतो अस तिलाही समजावलं.
त्याने तिच्यासाठी खुर्ची मागे सरसावली तर तिने स्वतःची खुर्ची स्वतः निवडून Independent असल्याची समज घातली. दोघांनी स्थानग्रहण केले.
Coffeeचा मंद सुगंध दरवळत होता. गिटारच्या तारा मंद सूर छेडत होत्या. टेबलावरील एकाच गुलाब मन डोकाऊन पाहत होता. तिच्या सौंदर्यावर कदाचित तो देखील भुलला होता. वाद्यांच्या आवजाखेरीज बाकी सर्व शांत होते. सुरवात कोण करेल याची वाट पाहत होते. waiter देखील wait करून थकला.त्यानेच मग थोडा पुढाकार घेतला.
“Order Please”
“Cappachinno” दोघेही एकदम उद्गारले.                                                                                                    आवड जुळलेली पाहून गालातल्या गालात हसले. waiterचे काम संपले होते. दोघांना सूर गवसले होते.
शांत तो पण आहे
शांत ती पण आहे
दोघांच्या या भेटीतला
नाजुकसा हा क्षण आहे...
 
 
सुरवात कोठून करावी
पण बुद्धीचा कोठे ठाव आहे..
नजर कॉफ्फीवर असली तरी
मनाची भलतीकडेच धाव आहे..
 
तिच्या जशा पापण्या लवतात
हृदयाचे याचे ठोके चुकतात..
तिच्या लाटांच्या हिंदोळ्यावर
बेफिकीर मग स्वेर झुलतात...    to be continued ( [/size]क्रमशः)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
next part kadhi ? khup romantic ahe..liked it

Offline Palande Vinod

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: तिची अन त्याची पहिलीच भेट
« Reply #2 on: February 01, 2013, 04:25:24 PM »
Mitra, kharach chan story aaahe. hi story continue kar, pn end nako karus.............

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: तिची अन त्याची पहिलीच भेट
« Reply #3 on: February 01, 2013, 05:09:27 PM »
mast mast ekdam mast

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):