Author Topic: आज राणी  (Read 1491 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
आज राणी
« on: January 25, 2013, 05:35:17 PM »
आज राणी पूर्वीची ती
प्रीत का उरलीच नाही
हात तुझा हाती तरीहि
मोहरला का स्पर्श नाही

बोललीस तू शब्द जरी
स्पर्श तुझा बोललाच नाही
प्रीत तुझी माझ्यावर   जरी
डोळ्यात ती दिसलीच नाही

चाललो मी तुझ्या मतांनी
वेगळा उरलोच नाही
एकदाच घडला प्रमाद
का घेतले समजून नाही?

ऐकले एकदाच मनाचे
विचारले न तुला मी

विचारूनी न ऐकण्याचा
गुन्हा मी केलाच नाही

मोडला न शब्द तुझा
झेलला नाही जरी
मीच बोलतो तुझ्या मुखी
अबोल कधी झालोच नाही

सोडला न हात तुझा
धरलाही  नाही जरी
साथ तुझ्या चाललो  मी
दूर किनारी थांबलो नाही

सोडला चल हट्ट माझा
सोड अबोला आज तुझा
दुखवून तुला जगण्याचा
हाय घडला आज गुन्हा

 
 
 
केदार...
« Last Edit: January 25, 2013, 05:35:49 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: आज राणी
« Reply #1 on: January 25, 2013, 05:53:31 PM »
मस्त आहे

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: आज राणी
« Reply #2 on: January 25, 2013, 05:56:10 PM »
कविता सुंदर आहे.आज राणी पूर्वीची ती प्रीत.. वाचल्यामुळे...  तू मागू नको.  असे डोक्यात येते .त्यामुळे कविता वाचतांना उगाचच मन तो संदर्भ शोधत राहते.हे टाळता येईल का ?

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आज राणी
« Reply #3 on: January 27, 2013, 08:28:31 AM »
vikrant,


khar sangaych tar hi kavita ashich dokyat aali aani aatta tu dakhave parynt he samy lakshatach nhavat aal...pan malaa vatat ty ganyatla ani hya kavitetala bhav purn vegala aahe. aani aata lihun jhali aahe mhantlyavar badal kjaran kathin aahe. :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: आज राणी
« Reply #4 on: January 28, 2013, 11:47:23 AM »
लिह्ल्यावर कविता आपली नसते .खर आहे.