Author Topic: कां मला असं वाटतं  (Read 2131 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
कां मला असं वाटतं
« on: January 28, 2013, 12:17:14 PM »

कां मला असं  वाटतं
तूं रोज रोज येतेस
उधळलेला आपला संसार
न कळत चोरून बघतेस ।
 
चोर पावले आलीस तरी
गंध काहीं लपत नाहीं
अदृष्य होऊन आलीस तरी
कळल्या वाचून रहात नाहीं ।

 रात्रीच्या त्या अंधारांत
रूप तुझे साकार होते
एकाकी हे जीवन माझे
ते कंठण्यास मदत होते ।

 जीवनांत तूं साथ असतां
तुझा आधार वाटत होता
जगण्याचा सारा आनंद
तुझ्या मुळेच मिळत होता ।

 तूं निघून गेलीस तेव्हां
जीवन फक्त स्वप्न ठरले
तुझ्या प्रेमळ स्मृतिंमुळे
नश्वर देही अडकून पडले ।

आज मी माझा नाहीं
तुझं फक्त शिल्प आहे
अधूरी राहिलेली स्वप्नें
पूर्ण करण्याचे यंत्र आहे ।

म्हणूनच आभास तुझा
रोज मला होत असतो
अन जीवन जगण्यासाठी
नवी स्फूर्ति देत असतो ।।रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this[/b
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_4979.html
« Last Edit: January 28, 2013, 12:19:17 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता

कां मला असं वाटतं
« on: January 28, 2013, 12:17:14 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: कां मला असं वाटतं
« Reply #1 on: January 28, 2013, 01:10:56 PM »
Aaj mla radatahi yet nahi...
Konala kahi sangatahi yet nahi...
Jase ashru sukalet maze...
Tase shabdahi muke zalet...
Kadhihi na abola dharanare te
aaj tyana bolatahi yet nahit...

....
Sadhnaji tumchi hi kavita vachun mazi ashi avasta zali ahe.

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: कां मला असं वाटतं
« Reply #2 on: January 29, 2013, 12:12:47 PM »
nice...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):