Author Topic: स्पर्श तुझ्या मिठीचा  (Read 3104 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
स्पर्श तुझ्या मिठीचा
« on: January 31, 2013, 12:53:16 PM »
स्पर्श तुझ्या मिठीचा 
   अजून मज जाणवतो
नजरेतील प्रेमभाव
   नेत्रासमोरी  उभा राहतो ।
तव कुंतलाचा मोद गंध 
   अजुनि  मनीं दरवळतो
श्वासांतील अधीर भाव 
   अजुनि मज भुलवितो।
शुक्राची चांदणी ती 
   आभाळी पुन्हां आली
परि दग्ध विरहाची शिक्षा 
   आता मला मिळाली ।
प्रीतिची हूरहूर ती
   जीव घेणी-जीव घेणी
अंतरांत भिरभिरती 
   धुंद तरल भाव कोणी ।
भरतीची ओढ जशी
   किनाऱ्यास लागते
तूं नसताना आतां 
   आठवणींस उधाण येते ।
गेलीस तू सोडून मजला 
   विरून त्या अनंतात
आठवणी तव कायम
   माझ्या मनास पोखरतात ।। रविंद्र बेंन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

 http://www.kaviravi.com/2012/07/blog-post_23.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: स्पर्श तुझ्या मिठीचा
« Reply #1 on: January 31, 2013, 03:32:30 PM »
Sadhna ji khup chan kavita ahe.

Suresh Kulkarni

  • Guest
Re: स्पर्श तुझ्या मिठीचा
« Reply #2 on: February 07, 2013, 06:09:22 PM »
 :)Kavita Chhan Aahe