Author Topic: क्रमशः... भाग...२  (Read 1341 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
क्रमशः... भाग...२
« on: January 31, 2013, 11:05:20 PM »
बोलता बोलता ती म्हणाली
मी फोन ठेवते
अता घर जवळ आले
नंतर तुझ्याशी बोलते
मी म्हटले चालेल
काही हरकत नाही
काही वेळचे आपले बोलणे
मला जन्मभर लक्षात राहील

ती म्हणाली call कट कर
मी म्हणालो तु कट कर
तुम्ही करा तु कर करता करता
बराच वेळ गेला
मग शेवटी कंटाळून
मीच कट केला

त्या रात्री मला
झोप नाही आली
डोळ्यासमोर सतत
तीच येत राहिली
झोप तर आली नाहीच
पण सकाळ मात्र झाली

मी उठलो phone उचलला
पहिला phone तिलाच लावला
तिनेही phone उचलला
आणि good morning म्हणाली
 
आता दिवस चांगला जाईल
म्हणून मला आनंद झाला
मनात आले रोज असेच व्हावे
phone वर का होईना
रोज तिचे दर्शन घडावे

असेच दिवस सरत आहेत
आता भेटी गाठीही होत आहेत
जन्मोजन्मीचे अनोळखी जीव
एकमेकांवर जीव लावत आहेत

पाहता पाहता मैत्री वाढली
मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले
आमचे आम्हालाच कळले नाही
कधी आम्ही एकमेकांत गुंतलो

आता ओढ वाढली आहे
भावनांवर control होत नाही
हीच ती वेळ आहे
जरा उशीर आणि
काही खरे नाही

अजूनही प्रेम अव्यक्तच आहे
कोणीतरी पुढाकार घेईल
ह्याच प्रतीक्षेत आहे

आताही वाटतेय
आपणच पुढाकार घ्यावा
प्रेमच्या ह्या नात्याला
लग्नाचा green signal दाखवावा

आता मीच तयारी करणार
तिची वाट नाही पहाणार
आता वेळ न घालवता
मनातले सांगून टाकणार

मित्रांनो आता जरा तुम्ही थांबा
आणि मला विचार करू द्या
काय करायचे कसे करायचे
ते जरा ठरवू द्या

आता इथेच थांबतो
पुढच्या कामाला लागतो
पुढे काय झाले ते
पुढच्या कवितेत सांगतो...
पुढच्या कवितेत सांगतो...
क्रमशः...

... प्राजुन्कुश
... Prajunkush

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #1 on: February 01, 2013, 10:52:40 AM »
vaat bagahtoy.... ;)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #2 on: February 01, 2013, 11:12:35 AM »
Kedar sir...
... Khup abhar agadi manapasun. Lavakarach kahitari ghadave ashi mazihi iccha ahech.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #3 on: February 01, 2013, 11:17:41 AM »
think positive & go ahed..
best of luck for you

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #4 on: February 01, 2013, 11:24:51 AM »
Prajdeep...
... Khup abhar agadi manapasun.

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #5 on: February 01, 2013, 12:57:02 PM »
mastch ekdam aamhi vaat pahtoy tujya pudhil olinchi

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #6 on: February 01, 2013, 01:11:53 PM »
Shubhangi ji...
... Khup abhar agadi manapasun.

Anish sheikh

 • Guest
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #7 on: February 09, 2013, 09:56:57 PM »
Best of luck, majhi stori pan ashich ahe...JE majhyasobat aata ghadat ahe,

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: क्रमशः... भाग...२
« Reply #8 on: February 11, 2013, 08:35:11 PM »
Anishji...
... Khup abhar agadi manapasun.