Author Topic: स्पर्श न करतो मदिरेला...  (Read 1323 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
स्पर्श न करतो मदिरेला...
« on: February 02, 2013, 09:24:16 AM »
नका नका रे लावू कलंक   
  म्हणू  नका मी दारू पितो
नेत्र हे माझे धुंद परि 
  मदिरेच्या न थेंब शिवतो ।
लटपटतात पाय ते माझे 
  भास होतसे झिंगण्याचा
परि न धरला हात कधी 
  पेला भरला मदिरेचा ।
दिसताच प्रियेचा सुंदर
  मुखडा  नेत्र माझे धुंदावती
अन स्पर्श सुखानेच तिच्या 
  पायातपाय घोटाळती ।
येउनी जाते प्रिया जेव्हां 
  धुंद होऊनी मज पाशांत
मादकता ती दिसते तुम्हां   
  माझ्या दोन्ही नेत्रात ।
नयनात आहे तेज सखीच्या 
  असंख्य कोटी तारकांचे
श्वासात तिच्या गंध दरवळे
  गुलाब चाफा बकुळ फुलांचे ।
का न व्हावे धुंद तन-मन
  अश्या सखीच्या सहवासात
का न जावे विसरुनी जगाला 
  अश्या प्रियेच्या सान्निध्यात ।
मिळेल का अशी धुंदी 
  कधी मदिरा प्राशनाने
होईल काया कंपित अशी
  कितीही जहाल मदिरेने ।
म्हणुनी विनवितो पुन्हां पुन्हां 
  कलंक लावू नका मला
दिसतो झिंगल्यावाणी मी जरी 
  परि स्पर्श न करतो मदिरेला ।।
    रविंद्र बेंन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/01/love-poem_25.html
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: स्पर्श न करतो मदिरेला...
« Reply #1 on: February 02, 2013, 10:30:36 AM »
Sadhnaji chan kavita ahe.

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
Re: स्पर्श न करतो मदिरेला...
« Reply #2 on: February 03, 2013, 12:57:09 AM »
thanks
Sadhana

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्पर्श न करतो मदिरेला...
« Reply #3 on: February 04, 2013, 11:06:51 AM »
kyaa baat hai