Author Topic: खोल माझ्या हृदयांत...  (Read 1851 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
खोल माझ्या हृदयांत...
« on: February 03, 2013, 07:33:45 AM »
खोल माझ्या हृदयांत 
     प्रीत हळवी जपली
लाख लाख धमन्यांनी 
   तिला डोळ्यात आणली ।
ओळख कधीं पासून 
   वर्षे अनेक उलटली
परि जीवनात अपुल्या 
   प्रीत न कधी फुलली ।
अचानक अव्यक्त अशा 
   प्रीतिचा खुलला रंग
जन्माची मिळो सोबत 
   हींच असे एकच मांग ।
हवी तुझीच साथ 
   श्रांत जीवाला विसावा
मीलन होऊन आपुले 
   कृतकृत्य जन्म व्हावा ।।   
                                         
 रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/01/love-poem_1642.html

Marathi Kavita : मराठी कविता

खोल माझ्या हृदयांत...
« on: February 03, 2013, 07:33:45 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: खोल माझ्या हृदयांत...
« Reply #1 on: February 03, 2013, 08:58:54 AM »
 Sadhna ji khup khup sundar kavita ahe. Ani hya shevatachya char oli tar...
हवी तुझीच साथ
   श्रांत जीवाला विसावा
मीलन होऊन आपुले
   कृतकृत्य जन्म व्हावा ।।
 
Regards...
Prajunkush...

विदुर

 • Guest
Re: खोल माझ्या हृदयांत...
« Reply #2 on: February 04, 2013, 03:58:57 AM »
कवितेचे रसग्रहण :


ह्या कवितेतले दुसरे कडवे असे आहे:

-----------------------

ओळख कधीं पासून
   वर्षे अनेक उलटली
परि जीवनात अपुल्या
   प्रीत न कधी फुलली ।

-----------------------

पण तिसर्‍या कडव्यात दोन ओळी आहेत त्या अश्या :

-----------------------

जन्माची मिळो सोबत
   हींच असे एकच मांग ।

----------------------

म्हणजे ह्या कवितेची "नायिका" "अनेक" वर्षे उलटून गेल्यानंतरही कवीला "जन्माची सोबत" देण्याकरता काही ना काही कारणांनी "साध्य" --म्हणजे अविवाहित-- राहिली होती की काय? की तिने आपल्या सद्यःच्या नवर्‍याबरोबर "काडीमोड" घेऊन कवीला "जन्माची सोबत" द्यावी अशी कवीची तिच्याकडे "एकच मांग" आहे? त्या "रमणी"करता "अनेक" वर्षे झुरत राहून अविवाहित रहाणारा कवीही जरा आगळा दिसतो. ते असो; "अनेक" वर्षांपूर्वीच त्याने तिच्याकडे "हवी तुझीच साथ, श्रांत जीवाला विसावा । मीलन होऊन आपुले, कृतकृत्य जन्म व्हावा ।।" हा "उत्तुंग" विचार प्रकट केला होता की नव्हता? प्रकट केला असल्यास त्याच वेळी तिने कवीचे पाणी ओळखून "नको बाबा मला तुझी "जन्माची (प्लेगसारखी) "साथ" असे आडवळणाने सांगून टाकले होते की काय? समजा "अनेक" वर्षांपूर्वी कवीने त्या "ललने"कडे तो "उत्तुंग" विचार काही कारणाने प्रकट केला नव्हता, आणि समजा कवीने तो विचार "आज" "अनेक" वर्षांनंतर त्या (विवाहित/अविवाहित) ललनेकडे प्रकट केला असला तर तिने त्यानंतर दिलेले उत्तर ह्याच कवितेत वाचकांच्या उत्सुकताशमनाकरता कवीला सहज पेश करता आले असते.

------------------------

अचानक अव्यक्त अशा
   प्रीतिचा खुलला रंग
जन्माची मिळो सोबत
   हींच असे एकच मांग ।

------------------------

वरच्या कडव्यात यमक साधण्याकरता कवीने "रंगा"च्या जोडीला एका "मांगा"ला आणून बसवले आहे. आता जरा अधिक चांगले यमकच साधायचे तर शेवटची ओळ --"उचितपणे"!-- अशी रचता आली असती : "म्हणे असे माझे अंग"! 

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: खोल माझ्या हृदयांत...
« Reply #3 on: February 04, 2013, 08:12:23 AM »
no commemts on this,but another example of premgeet, written byme:  Hrudayaat maajhyaa khol, preetiche tujhiyaa bol.lewunee ShruMgaar saaj. lapale aahet aaj.|1| aikaNyaa tayaaMche gaan,laavasheel jaraa kaan,pahoon lavalelee maan,dhaDadhaDe hruday saan|2|sugandhi tujhaa gajaraa, ruLataa maajhyaa Chaativaree,vaLalyaa sarvaaMchyaa najaraamoha na majalaa aawaree.  Mhanoon lihito geet,  wachunee Thev manaat,sfurell tyaa tyaa kaaLee,gai yaa chaar oLi.-------krishnakumarpradhan

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):