Author Topic: तू  (Read 4855 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
तू
« on: February 03, 2013, 03:26:59 PM »
त्या दिवशी तू आलीस
एक अनोखे सुख देऊन गेलीस
पनवेल - खांदेश्वर ४ मिनिटांचा प्रवास
दुर्मिळ होता तुझा तो सहवास
बोललो नाही काहीच फक्त ऐकत राहिलो
बघून तुझ्या डोळ्यात स्वतःलाच हरवत राहिलो
बोलायचे होते बरेच काही
पण ४ मिनिटे पुरेसे नाही
तू आलीस तेच पुरे होते
माझ्यासाठी तेवढे सुखही खूप होते
परत वाट बघेन त्या क्षणाची
त्या सुंदर अशा भेटीची
तेव्हा मात्र वेळ घालवणार नाही
बोलायचं काही ठेवणार नाही
नंतर मात्र तूच बोलत असशील
आणि मी मात्र उत्तर ऐकण्यास आतुर असेल
तुझ्याविना जीवन माझे कसे असेल?
जसा पाण्याबाहेर तडफडणारा एक मासा असेल
उत्तरासाठी माझी काही घाई नाही
पण तुझ्याविना मला जगता येणार नाही
तूच बघ आता काय करायचे?
मला उत्तर काय द्यायचे?
जे काही मला वाटत आहे
काय तुलाही ते वाटत असेल?
मी आता काहीच करणार नाही
टेन्शन तर अजिबात घेणार नाही
मी वाट बघतोय हे विसरू नको
उत्तर द्यायला मात्र लाजू नको
उत्तर तुझे मान्य मला असेल
तुझ्यावर मी रागावणार तरी कसे?
तुझ्यावर मी रागावणार तरी कसे?
तुझ्यावर मी रागावणार तरी कसे?
 :( :( :(
 
« Last Edit: February 03, 2013, 03:58:37 PM by praajdeep »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तू
« Reply #1 on: February 03, 2013, 03:36:57 PM »
छान!
पण '४' च्या ऐवजी 'आणि' असे असायला हवे होते. आणि  'Tension' शब्द 'टेन्शन' असा लिहावा.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तू
« Reply #2 on: February 03, 2013, 03:44:55 PM »
Prajdeep khup mast. Ti nakkich ho mhanel. Best luck.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तू
« Reply #3 on: February 03, 2013, 03:45:48 PM »
thanks mam
pan konatya 4 chya thikani aani takaych
४ मी. mhanje 4 min.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तू
« Reply #4 on: February 03, 2013, 03:47:05 PM »
Danyawad  Mitra

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तू
« Reply #5 on: February 03, 2013, 03:49:21 PM »
अच्छा! 'मी.' म्हणजे 'मिनिट' हे एकक म्हणून वापरलं आहे होय? मग ठीक आहे.
« Last Edit: February 03, 2013, 03:52:17 PM by Madhura Kulkarni »

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तू
« Reply #6 on: February 03, 2013, 04:02:04 PM »
आता ठिक  आहे का मधुरा madam ? :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तू
« Reply #7 on: February 03, 2013, 04:06:47 PM »
:) कवितेत शॉर्ट-फॉर्म आणि  इंग्रजी शब्द वापरायचे नसतात. म्हणून थोडं कन्फ्युजन झाल.

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तू
« Reply #8 on: February 03, 2013, 04:17:08 PM »
सॉरी मॅम पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन
Thanks ;) :)

विदुर

 • Guest
Re: तू
« Reply #9 on: February 04, 2013, 01:49:21 AM »

ह्या कवितेत खालच्या चार ओळी आहेत.

------------------------------------

"तुझ्याविना जीवन माझे कसे असेल?
जसा पाण्याबाहेर तडफडणारा एक मासा असेल
उत्तरासाठी माझी काही घाई नाही
पण तुझ्याविना मला जगता येणार नाही"


-------------------------------------


इतर सगळ्या ओळींमधेही स्वप्नाळूपणा ओतप्रोत  भरलेला आहे. "पाण्याबाहेर तडफडणारा मासा" वगैरे वगैरे सगळा testosteroneचा प्रभाव आहे.
 
समजा त्या कोणा "चार मिनिटांच्या" "सर्वगुणसंपन्न अप्सरे"ने ह्या कवीतही तितक्याच स्वप्नाळूपणे "सर्वगुणसंपन्नता" पाहून (आणि मुख्य म्हणजे कवीला निदान जरा बर्‍यापैकी पगाराची नोकरी असल्यास ती गोष्ट शहाणपणाने पाहून !!) "होकाराचे उत्तर" दिलेच आणि मग समजा त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात "माळ" घातलीच तर त्यानंतर एका वर्षात सत्यसृष्टीतला मामला पार वेगळाच असल्याचे कवीच्या (आणि त्या अप्सरेच्याही) लक्षात येईल! मग  कुठला "पाण्याबाहेर तडफडणारा मासा" आणि कुठले काय!