Author Topic: तुझाच बनून जातो...  (Read 1331 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तुझाच बनून जातो...
« on: February 03, 2013, 10:21:10 PM »
त्या क्षणापासून फक्त..
तुझीच वाट पहातो
तु स्पर्शलेल्या हाताच्या
गंधावरच जगतो
त्या क्षणापासून फक्त..
तुलाच आठवतो
तु पाहिलेले माझे रूप
रोज आरशात न्याहाळतो
त्या क्षणापासून फक्त..
तुलाच मनात ऐकतो
तु एकाविलेले काव्य
सतत गुणगुणत राहतो
त्या क्षणापासून फक्त..
तुलाच मनात पाहतो
तुझे मोहक रूप
सतत हृदयात साठवतो
त्या क्षणापासून फक्त..
तुझेच गुण गातो
तुझे गुण गाता गाता
स्वतालाही विसरतो
त्या क्षणापासून फक्त..
तुझीच स्वप्ने पाहतो
तुझी स्वप्ने पाहता पाहता
तुझाच बनून जातो
तुझाच बनून जातो...

... प्राजुन्कुश
... Prajunkush
« Last Edit: February 03, 2013, 10:25:38 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझाच बनून जातो...
« Reply #1 on: February 04, 2013, 11:14:48 AM »
chan

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
Re: तुझाच बनून जातो...
« Reply #2 on: February 04, 2013, 11:53:53 AM »
wah mitra zakas :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुझाच बनून जातो...
« Reply #3 on: February 04, 2013, 11:59:18 AM »
Kedar sir, Prajdeep...
... Khup abhar agadi manapasun.